कौशिक आश्रम - सभागृह/बैठक कक्ष आरक्षण व्यवस्था

Submit your booking request / तुमची बुकिंग विनंती सादर करा

सूचना:

१. आपण कार्यक्रम/बैठकीसाठी आरक्षित कक्ष अथवा सभागृह येथील खुर्च्यांची व्यवस्था कार्यक्रमा आधी निश्चित करावी.

२. आपल्या बैठक/कार्यक्रमावेळी चहा, अल्पोपहार, भोजन याची व्यवस्था आपली आपण करावी. कौशिक आश्रमच्या व्यवस्थेतून ती होणार नाही. कृपया कौशिक आश्रम च्या कर्मचारी वर्गाकडे तशी मागणी करू नये.

३. चहा, अल्पोपहार, भोजन व्यवस्था असल्यास खाली पार्किंग मध्ये अथवा गच्चीवर करावी. सभागृह, बैठक कक्ष, निवासी मजले येथे ती व्यवस्था करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

४. कार्यक्रमादरम्यान आपण फुले, हार, रांगोळी, सजावट केली असल्यास कार्यक्रमानंतर ती काढून स्वच्छ करण्याची व्यवस्था करावी.

५. सभागृह, बैठक कक्ष येथे कार्यक्रम/बैठकीनंतर खुर्च्या पुन्हा आधी सारख्या लावून जाव्यात.

६. चहा, अल्पोपहार, भोजन व्यवस्था रात्री ८ नंतर करता येणार नाही ह्याची नोंद घेणे.

७. सभागृह/बैठक कक्ष आरक्षण व्यवस्था रात्री ८ नंतर उपलब्ध राहणार नाही आणि रात्री ८ पर्यंतच आरक्षित करता येतील ह्याची नोंद घ्यावी.

८. सगळ्या संध्याकाळच्या बैठका रात्री ८ पर्यन्त संपतील अशी काळजी घेणे.